PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं साईबाबांचं दर्शन; पाहा व्हिडिओ - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published : Oct 26, 2023, 2:35 PM IST
|Updated : Oct 26, 2023, 3:10 PM IST
शिर्डी PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डी साईमंदिरात भेट दिली. यावेळी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण होत आहे. शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावं, यासाठी साई संस्थाननं १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. एसी दर्शन रांग, शैक्षणिक संकुल, निळवंडे प्रकल्प आदी कामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या सोबतच मोदींच्या उपस्थितीत येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचं या दौऱ्याच्या आयोजकांकडून सांगितलं जातंय. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्री, राज्यमंत्री, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.