महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रवादीचे पिंडदान आंदोलन

ETV Bharat / videos

NCP Pinddan Aandolan : दिंडोशीच्या खड्ड्यात पिंडदान करून मुंबई महानगरपालिकेचा निषेध - NCP Pinddan Aandolan

By

Published : Jul 28, 2023, 10:39 PM IST

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) खड्ड्याविरोधात मुंबईतील दिंडोशी मतदारसंघात पिंडदान आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी झाडे लावून बीएमसीचा निषेध केला. उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे म्हणाले की, खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे. आजच्या आंदोलनानंतरही खड्डे न भरल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे प्रवाशांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

खड्ड्यांवरून पालिकेवर टीकास्त्र :मुंबई प्रादेशिक राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी दिंडोशीतील खड्ड्यांवरून पालिकेवर टीकास्त्र सोडले आहे. दिंडोशीत खड्ड्यांचे साम्राज्य असतानाही महापालिका हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी रघुनाथ कोठारी, शेखर चव्हाण, जिल्हा पदाधिकारी शेहराज मलिक, अंजली कदम, सुरेश सावंत, तालुका पदाधिकारी, तालुका आघाडी प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, महिला प्रभाग अध्यक्षा, महिला मंडळ पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details