महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jalna PFI Protest : पीएफआय नेता अब्दुल हादी समर्थनार्थ जालन्यात 'एनआयओ गो बॅक'च्या घोषणाबाजी, पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज - Jalna PFI Protest

By

Published : Sep 23, 2022, 7:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

जालना : दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत (Funding for terrorist activities) करण्याच्या संशयातून ई़़डी आणि एनआयए या संस्थांनी (PFI raid by ED and NIA) काल देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे टाकले. यामध्ये 100 पेक्षा जास्त पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात (arrest of PFI worker) घेण्यात आले. या दरम्यान काल NIA नं देशभरात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना टेरर फंडिंगप्रकरणी चौकशीसाठी (inquiry into terror funding case) ताब्यात घेतलं. जळगावमधून अटक करण्यात आलेल्या अब्दुल हादी अब्दुल रौफ ( Abdul Hadi arrested) याला आज जालना शहरातील रहिमान गंज भागात चौकशीसाठी आणण्यात आले होते. यावेळी पॉपुलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी 'NIA GO BACK'ची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. विरोध दरम्यान NIA आणि ATS कडून या प्रकरणी कसून चौकशी केल्या जात आहे. पीएफआय कार्यकर्त्यांच्या घराचीही झाडाझडती घेतली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details