petition filed against Dandiya program : फाल्गुनी पाठक यांचा दांडिया कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात, न्यायलयात याचिका दाखल - Falguni Pathak Dandiya program
नवरात्री उत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यानिमित्त (Mumbai) कांदिवली (पश्चिम) येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर दांडिया क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या फाल्गुनी पाठक (Falguni Pathak Dandiya program) हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा विरोधात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल (petition filed against) केली आहे. तसेच या मैदानाचे ‘व्यावसायिकीकरण’ रोखण्याच्या दृष्टीने आणि क्रीडांगणावरील अशा सर्व कार्यक्रमांना नागरिकांना मोफत प्रवेश देण्याचे; राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेनंतर आता या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईटिव्ही भारतने या सर्व प्रकरणांचा आढावा घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST