महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Yavatmal flood : बेंबळा धरणाची 18 दरवाजे उघडल्याने, पाण्याच्या प्रवाहात 2 जण अडकले - महाराष्ट्र पावसाचे अपडेट

By

Published : Jul 19, 2022, 8:47 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

यवतमाळ - गेल्या 24 तासापासून जिल्ह्यात ( Yavatmal district ) सतत पाऊस ( heavy rain ) सुरू आहे. अशातच बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पातुन सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शेतशिवारात पाणी शिरले असून या पुरात 2 व्यक्ती शेतातील झाडावर अडकून पडले आहे. महादेव पवार व मारुती चव्हाण अडकून पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बेंबळा धरणाचे 20 दरवाजे ( Gates of Bembla Dam ) उघडल्या गेल्याने पाण्याचा प्रवाह लगतच्या शेतांमध्ये शिरले आहे. याठिकाणी शेतकामासाठी गेलेले 2 व्यक्ती जीव वाचविण्यासाठी झाडावर चढले. दरम्यान पुराचे पाणी वाढल्याने हे दोघेजण झाडावर 5 तासांपासून अडकून पडले आहे. त्यांच्या सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक बेंबळा प्रकल्पावर दाखल झाले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details