MLA Jitesh Antapurkar: आमदार जितेश अंतापूरकरांची गाडी लोकांनी अडवली; अंतापूरकरांची बोलती बंद - आमदार जितेश अंतापूरकरांना लोकांनी अडवले
नांदेड - नांदेडमध्ये विद्युत पुरवठ्या अभावी त्रस्त ग्रामस्थांनी आमदाराला घेराव घातल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( MLA Jitesh Antapurkar ) बिलोली तालुक्यातील गागलेगाव इथला हा व्हीडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर हे परिस्थितीची पाहणी करताना गेले असता काही जणांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. गावाला विद्युत ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार होती, गावकऱ्यांनी सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल करत आपल्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST