महाराष्ट्र

maharashtra

इर्शाळवाडी नागरिकांना केले स्थलांतरीत

ETV Bharat / videos

Chandepatti village: दरड कोसळण्याच्या भीतीने चांदेपट्टी गावातील नागरिकांचे स्थलांतर ...

By

Published : Jul 21, 2023, 6:26 PM IST

रायगड : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावावर गेली 18 वर्षापासून दरडीची टांगती तलवार आहे. पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी गावातील 34 ग्रामस्थांना तात्पुरते स्थलांतरित केले असून, त्यांना गणपतीवाडी येथील मराठा समाज भवनात ठेवण्यात आले आहे. उर्वरित ग्रामस्थांचेही स्थलांतर करण्यात येत आहे. दरवर्षी चांदेपट्टी गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले जाते. परंतु पावसाळा संपताच त्यांच्याकडे कोणी फिरकून देखील पाहत नाही. गावाला दरड व दुष्काळाची भीती असून संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पेण तालुक्याला पावसाने झोडपले असून अनेक गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. यावर खबरदारी म्हणून पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे या स्वतः प्रत्यक्ष जावून योग्य उपाय योजना करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details