महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : जागरूक नागरिकांमुळे वाचले मोराच्या पिल्लाचे प्राण - bird friend

By

Published : Jul 29, 2022, 11:56 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

धुळे (Dhule) शहरातील देवपूर पंचवटी भागात, आषाढी अमावस्येच्या सायंकाळी मोराचे पिल्लू (Peacock puppy lives saved) आढळले. लहान मुलांचा घोळका एका पक्षाच्या मागे पळत असल्याचे परिसरातील काही जागरूक नागरिकांना (by aware citizens in Dhule) समजले. त्यानंतर त्यांनी पक्षी मित्रांना (bird friend) बोलावले. पक्षी मित्रांनी त्या मोराच्या पिल्लाला ताब्यात घेत थेट देवपूर पोलीस स्टेशन गाठले. आषाढी अमावस्येच्या रात्री गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी तळीरामांनी या मोराच्या पिल्लाला आणले तर नसेल ना? असा संशय वन विभागाला असल्याने, त्या दृष्टीने वन विभाग तपास करीत आहे. पक्षी मित्रांनी या मोराच्या पिल्लाला ताब्यात घेत देवपूर पोलीस स्टेशन गाठले. या मोराच्या पिल्लाला वन विभागाच्या हवाली करण्यात येणार असल्याचे, पक्षी मित्रांनी यावेळी सांगितले. भर वस्तीत आषाढी अमावस्येच्या सायंकाळी मोराचे पिल्लू आढळून आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details