रेंडाळे गावात मोराने भरउन्हात फुलवला पिसारा, शेतकरी करतोय 8 वर्षांपासून पशु पक्षांच्या पाण्याची सोय - मोराने भरउन्हात फुलवला पिसारा
येवला ( नाशिक ) - भर उन्हाळ्यात अन्न, पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ वन्यपशू पक्षांवर येत असल्याने मागील आठ वर्षांपासून येवला तालुक्यातील रेंडाळा गावातील वन्यजीव प्रेमी प्रवीण आहेर यांनी आपल्या शेतात वन्य पशू पक्षांसाठी पाण्याची कुंडी ठेवली. यातील पाणी पिऊन आपली तहान भागवत असल्याचे चित्र दिसत आहे. भर उन्हाळ्यात पाणी पिल्यानंतर मोराने पिसारा फुलवला असल्याचे दृश्य सध्या रेंडाळे गावात दिसत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST