झाड कापल्याने हजारो पक्षांचा जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायल; पक्ष प्रेमींकडून हळहळ व्यक्त - Video from Tirurangadi town in Malappuram district
मलप्पुरम (केरळा) - सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ असे देखील आहेत, ज्यांना पाहून आपले होशच उडून जातात, तर काही व्हिडिओ असे आहेत जे पाहून आपल्याला खूप वाईट वाटते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक अतिशय दुःखद अपघात पाहायला मिळेल. काही वेळा काही लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका निष्पाप प्राण्यांना सहन करावा लागतो. या व्हिडीओमध्येही असेच काहीसे घडले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी (दि. 1 सप्टेंबर)रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तिरुरंगडी शहरातून समोर आला आहे. चिंचेचे मोठे झाड कापल्यामुळे शेकडो पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST