parliament monsoon session : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखडांनी आप खासदार राघव चढ्ढांना फटकारले - संसदेचे पावासाळी अधिवेशन
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधीपक्ष भाजपला मणिपूरच्या घटनेवरुन धारेवर धरत आहेत. या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागणारे आम आदमी पक्षाच्या खासदारांना अध्यक्षांनी फटकारले. आपचे खासदार हे दुसरे तिसरे कोणी नाही तर राघव चढ्ढा आहेत. राज्यसभेच्या कामकाजावेळी अध्यक्ष जगदीप धनखड आप खासदार राघव चढ्ढा यांच्यावर संतापले. धनखड म्हणाले की, राघव तुम्ही जागा घ्या, सीटवर बसा. तुमच्या सीटमध्ये काहीतरी गडबड आहे का? तुम्ही प्रत्येकवेळी उडी मारत आहात. दरम्यान मणिपूरच्या घटनेवरुन राज्यसभेत गदरोळ चालू होता. त्यावेळी आप खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, 'मणिपूरमधील हिंसाचाराने आमची सामूहिक विवेकबुद्धी हादरली आहे. केंद्र सरकारला विनंती आहे की, आपल्या झोपेतून उठावे. मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करावी. मणिपूरमध्ये काय चालू आहे, हे सांगावे. सरकारने काय केले आहे देशाला सांगावे आणि तेथे राष्ट्रपती शासन लागू करावे.