शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्याकडून ऐका संसदेत पिवळा धूर सोडण्याच्या घटनेची पूर्ण कहाणी - लोकसभेवर हल्ला
Published : Dec 13, 2023, 7:48 PM IST
नवी दिल्ली Parliament Attack :बुधवारी जेव्हा दोन तरुणांनी लोकसभेत घुसून गोंधळ घातला, तेव्हाशिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने तेथेच उपस्थित होते. संसद भवनाबाहेर आल्यानंतर त्यांनी मीडियाला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. धैर्यशील माने यांनी सांगितलं की, "दोन तरुण आत आले. त्यापैकी एकानं काही समजण्यापूर्वीच त्याच्या बुटातून काहीतरी बाहेर काढलं. आम्हाला कोणावर तरी हल्ला होईल असं वाटलं, मात्र त्यानं स्प्रे फवारणं सुरू केलं. यानंतर सभागृहात दुर्गंध पसरला. दरम्यान, सर्व खासदारांनी मिळून या दोघांनाही पकडलं. नंतर त्यांना सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आलं". धैर्यशील माने यांनी सांगितलं की, "आता अशा पासवर कोणी आत गेल्यास संसद भवनातून निर्णय घेतला जाऊ शकतो. आम्ही आमच्या नातेवाईकांनाही भेटायला घेऊन येतो. पण अशी चूक होणं ही एक मोठी गोष्ट आहे", असं ते म्हणाले.