अमोलच्या आईला हुंदका आवरेना म्हणाल्या, "भरतीसाठी गावोगावी भटकत होता, देशसेवा करायची होती", ETV Bharat शी Exclusive बातचित
Published : Dec 15, 2023, 7:29 PM IST
लातूर : बुधवारी (१३ डिसेंबर) संसदेबाहेर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. येथे दोन जणांना घोषणाबाजी करताना ताब्यात घेण्यात आलं. यापैकी एक जण लातूर जिल्ह्यातील आहे. अमोल शिंदे असं त्याचं नाव असून तो शेतात मजूरीचं काम करतो. हा तरुण चाकूर तालुक्यातील झरी (नवकुंडाची) येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर पोलीस अमोलच्या घरी दाखल झाले. त्यांनी त्याच्या आईवडिलांची कसून चौकशी केली. पोलीसांनी अमोलची सर्व शैक्षणिक कागदपत्रं आणि त्याच्या वडील आणि भावांचे मोबाईल चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. अमोल शिंदेची आई केशरबाई शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना, या प्रकरणाबद्दल काही माहिती नसल्याचं सांगितलं. माझा मुलगा सुखरुप घरी परतावा अशी मागणी असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.अमोल शिंदे याच्या आई काय म्हणाल्या ते पाहा.