Pankaja Munde On Maratha Reservation : मराठा आंदोलनाबाबत चौकशी झाली पाहिजे - पंकजा मुंडे - Pankaja Munde
Published : Sep 4, 2023, 12:35 PM IST
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : Pankaja Munde On Maratha Reservation जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज उपोषणाला बसला होता. उपोषणाला बसलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Lathicharge in Jalna) केल्यामुळे उपोषणकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर आता बीड, लातूर, धाराशिव आणि परभणीत बंद पुकारण्यात आला. यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, मराठा आरक्षणासाठी झालेली अप्रिय घटना घडायला नको होती. आंदोलक म्हणतोय की, सरकार सांगतेय तसं घडलं नाही. तर सरकारने निःपक्षपातीपने चौकशी व्हायला हवी. तूर्तास ज्यांच्यावर हल्ला झाला जे जखमी आहेत त्यांच्या प्रति माझ्या संवेदना आहेत. मराठा आरक्षण मुद्द्यावरून (Maratha Reservation Issue) ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नये, मराठा ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो अयशस्वी करू असं मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.