महाराष्ट्र

maharashtra

सिलिंडरच्या स्फोटात गाडीचे नुकसान

ETV Bharat / videos

ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनात सिलेंडरचा स्फोट - Oxygen Cylinders Blast

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 10:55 PM IST

नाशिकOxygen Cylinders Blast:शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील पंपिंग स्टेशन येथे ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनातील सिलेंडरचा स्फोट झाला. (Explosion of cylinder in vehicle) हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे आजूबाजूच्या वाहनांच्या तसेच इमारतीच्या काचा फुटल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. (damage to vehicle due to explosion)

दोन ऑक्सिजन टाक्यांचा ब्लास्ट:मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर भागातील पंपिंग स्टेशन रोड येथे हॉस्पिटलसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनातील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. ऑक्सिजन वाहून नेणारे वाहन डिवायडरला आदळल्याने दोन ऑक्सिजन टाक्यांचा ब्लास्ट झाल्याने परिसरात जोरदार आवाज झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की परिसरातील वाहनाच्या तसेच इमारतीच्या काचा देखील फुटल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. जवळपास एक किलोमीटर पर्यंत आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details