Kalwa Railway Station कळवा रेल्वे स्थानकात राडा, पोलिसांनी केला लाठीचार्ज
ठाणे कळवा स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या कारशेडमध्ये सुटणाऱ्या लोकलमध्ये कळवेकर प्रवास करीत Kalvekar Daily Traveling in Local होते. मात्र, त्या ठिकाणी एसी लोकलच्या गाड्या AC Local Trains at Local Train Place असल्याने त्या ठिकाणाहून प्रवास करण्यास रेल्वे पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा उद्रेक झालेला आहे. यामुळे प्रवाशांचा आणि पोलिसांचा वाद होऊन पोलिसांनी लाठीचार्ज Police had to Resort to Baton Charge केला आहे. कळवा स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या स्थानकात कायम गर्दी असते. आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकल उपलब्ध असल्याने प्रवाशी त्यात जात होते. त्यांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस तैनात होते. गर्दीचा उद्रेक झाल्याने कळवा स्थानकात पोलिसांची आणि प्रवाशांची धक्काबुक्की झाली. त्यामुळे प्रवाशांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST