Navratri Festival 2022: नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची सिद्धीदात्री रुपात अलंकार पूजा - Ornamental worship of Ambabai Siddhidatri
Navratri Festival 2022 कोल्हापूर Navratri Festival 2022 शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची सिद्धीदात्री रुपात अलंकार पूजा Ornamental worship of Ambabai Siddhidatri साकारण्यात आली. Navratri Festival सिद्धीदात्री हे नवदुर्गातील अंतिम रूप मानले जाते. जेव्हा मार्कंडेय मुनी ब्रह्मदेवांना मला जगातील गुहृय गोष्ट सांगा अशी विनंती करतात. तेव्हा ब्रह्मदेवांनी परम गुप्त असे लोकांवर उपकार करणारे देवी कवच सांगितले. या देवी कवचाच्या प्रारंभीच या नवदुर्गांचा उल्लेख आला आहे. शैलपुत्री पासून सुरू झालेली ही मालिका ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धीदात्री अशा क्रमांकाने पूर्ण होते. यातली सिद्धीदात्री म्हणजे आपल्या उपासनेचे पूर्ण फल प्रदान करणारी देवी. सिद्धी म्हणजेच सामर्थ्य अष्ट महासिद्धी या जगप्रसिद्ध आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST