Diwali Padwa : दिवाळी पाडव्यानिमित्त ‘घर तिथं रांगोळी’ स्पर्धेचं आयोजन - Ghar Tith Rangoli competition
Published : Nov 15, 2023, 9:31 PM IST
कोपरगाव (अहमदनगर)Diwali Padwa :येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीनं कोपरगाव महोत्सवांतर्गत यंदा दिवाळी-पाडव्यानिमित्त ‘घर तिथं रांगोळी’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेऊन घरोघरी रांगोळ्या काढल्या. यंदाचं हे अकरावं वर्ष असून सुशांत घोडके सूर्यतेज संस्थेचे संस्थापक आहेत. सलग दहाव्या वर्षी कोपरगाववासीयांनी नयनरम्य रांगोळी काढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी प्रथम घरासमोर रांगोळी काढण्याची भारतात मोठी परंपरा आहे. 64 प्रकारामध्ये रांगोळी कलेला महत्त्व आहे. रांगोळी सर्वसमावेशक काढण्यासाठी स्पर्धेमध्ये पारंपारिक, निसर्गचित्र, चित्र, सामाजिक विषय, व्यक्तीचित्र, असे पाच विषय ठेवण्यात आले होते. प्रत्येक विषयातील प्रथम विजेत्याला कापसे पैठणी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. या स्पर्धेत मुली, महिलांसह युवकांचाही लक्षणीय सहभाग होता.