महाराष्ट्र

maharashtra

Ashadhi Ekadashi

ETV Bharat / videos

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य शासकीय पूजा

By

Published : Jun 29, 2023, 5:43 PM IST

पुणे :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तिमय वातावरण असून विठू नामाचा जयघोष होत आहे. असे असतानाही प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी केली होती. आषाढी एकादशीला प्रत्येकाला पंढरपूरला जाणे जमत नाही. अशा वेळी विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक सिंहगड रोडजवळील प्रतिपंढरपूर मंदिरात जातात. पुण्यातील या प्रतिपंढरपूरमध्ये खडकवासला, डोणजे, खानापूर, पानशेत, पुरंदर, मुळशी, हवेली, वेल्हे आदी गावांतील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. तसेच पुणे शहरातील नागरिक ही मंदिरात दर्शनाची आतुर्तेने वाट पाहत असतात. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य शासकीय पूजा करण्यात आली. आषाढीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांचे मन विठूमाऊलाच्या दर्शनासाठी त्यांचे आतूर झाले होते. कधी एकदा विठ्ठलाचे मुखदर्शन होते अशी भावना त्यांच्या मनात होती. वारकऱ्यांसाठी प्रशासनाने देखील अनेक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details