Har Ghar Tiranga जीआरपी व सीआरपीएफ रेल्वे पोलीसांच्या वतीने जल्लोषात अमृत महोत्सव साजरा - Flag March
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर बोरिवली स्टेशन येथे बँडसह रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत जीआरपी रेल्वे पोलीस आणि सीआरपीएफ रेल्वे पोलीस यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅली मध्ये स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जसजसा जवळ येत आहे. तसतसा प्रत्येक देशप्रेमी आनंद साजरा करत आहे. या रॅलीमध्ये, जीआरपी रेल्वे पोलीस आणि सीआरपीएफ रेल्वे पोलीस यांनी मिळून आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकावर एक भव्य रॅली काढली. ज्यामध्ये प्रत्येकाच्या हातात देशाची शान असलेला तिरंगा होता आणि कार्यक्रमात चैतन्य आणणारा बँड वाजाही होता. बोरिवली रेल्वे पोलिसांनी जल्लोषात हातात झेंडा घेऊन फ्लॅग मार्च काढला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST