old pension scheme strike: बुलढाणा जिल्ह्यातील 28 हजार 500 कर्मचारी संपावर; आरोग्य व्यवस्था, जनसेवा विस्कळीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बुलढाणा:जिल्ह्यातील 28 हजार 500 कर्मचारी संपावर गेल्याने पूर्ण व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे जन सेवा ही विस्कळीत झाली आहे. या संपामध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने आरोग्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील साडेआठ हजार कर्मचारी, आरोग्य विभागातील पाचशे कर्मचारी, जिल्हा परिषद विभागातील पंधरा हजार कर्मचारी संपावर गेले आहे. त्यामुळे जनसेवेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. तसेच नगरपालिकेतील साडेपाच हजार कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधे पासून वंचित राहावे लागत आहे. तसेच जिल्हा परिषद जिल्हाधिकारी व जिल्हा सामान्य रुग्णालय व पंचायत समिती नगरपालिका या कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही. तोपर्यंत हा संप बेमुदत संप सुरू राहणार असल्याचे संपकऱ्यांनी सांगितले आहे.
राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी संपावर: जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी 14 मार्च पासून बेमुदत संपावर गेले आहे. सोमवारी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याबरोबर कर्मचारी संघटनांची बैठक झाली. मात्र निश्चित तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत. या संपामुळे सरकारी रुग्णालय, शाळा, कॉलेज पालिका बहुतांशी सरकारी विभाग आज ठप्प झाले आहेत. तर याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावरील होण्याची शक्यता आहे. सरकारच्या पेन्शन बैठकीत तोडगा नाही. ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही. सरकारने संघटनाचे म्हणणे ऐकून घेतले. सरकारने ही आपली बाजू संघटनासमोर ठेवली. निवृत्त नंतर सुरक्षितता देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांना दिली. आता संघटनांच्या मागणीसाठी समिती नेमली जाणार आहे. समिती याबाबत अभ्यास करून अहवाल देणार. त्यानंतर सरकार निर्णय घेणार असल्याचे कळते. मात्र सरकारकडून कोणतीही ठोस आश्वासन न मिळाल्याने संपूर्ण राज्य जिल्ह्यातले कर्मचारी संपावर ठाम आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 28 हजार पाचशे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. शासकीय व निमशासकीय कर्मचारी आज सकाळपासूनच आपापल्या कार्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत.