Old Currency Notes Seized : नोटबंदीच्या 6 वर्षांनंतर सापडले जुन्या नोटांचे घबाड! पहा व्हिडिओ - जुन्या हजारच्या नोटा जप्त
कासारगोड, केरळच्या कासारगोड येथे एका निर्जन घरातून एक कोटी रुपयांच्या जुन्या हजारच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कासारगोड जिल्ह्यातील मुंड्याथातुक्का येथील शफी याच्या घरात चलनी नोटांचे पाच पोते सापडले आहेत. बठियादुक्का पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. घरात राहणाऱ्यांचे रिअल इस्टेट माफियांशी संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रात्री अनोळखी लोक ये - जा करत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर बथियादुक्का पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासणी केली. या प्रकरणी बथियादुक्का पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. नोटांच्या बंडलांसह नोटांच्या आकाराचे कागदाचे बंडलही सापडले आहेत.