महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pune Police on PFI Pune Protest: पुण्यात पीएफआयचे आंदोलन, 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; पोलीस म्हणाले...

By

Published : Sep 24, 2022, 4:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पुणे : पुण्यासह राज्यभरात 'एनआयए'कडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड (PFI activist arrest) केली आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं (PFI Protest in Pune) आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली (PFI Raise Slogans Against Central Government) . या घोषणाबाजी दरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे (PFI Pakistan Zindabad Slogan) लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे. यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनचे (Bundagarden Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, पीएफआय संघटेनला आंदोलनाची परवानगी नाकारली (PFI denied permission to protest) असताना देखील बेकायदेशीरपणे जमाव जमवून आंदोलन केला आहे. पोलिसांनी तत्काळ 41 लोकांना ताब्यात घेतलं. याबाबतचा पुढील तपास बंद गार्डन पोलीस करत आहे अशा देखील यावेळी मानकर म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details