महाराष्ट्र

maharashtra

कुणबी मराठा समाज

ETV Bharat / videos

OBC Samaj Demands: 'या' मागणीसाठी मराठवाडा वाईंदेशी कुणबी मराठा सेवा संघाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, पाहा व्हिडिओ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 10:49 PM IST

जालनाOBC Samaj Demands:मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झालीय. मराठवाडा विभागामध्ये वाईंदेशी कुणबी मराठा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कुणबी मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय प्रवर्गात समावेश करावा, अशी विनंती आता वाईंदेशी कुणबी सेवा संघ (मराठवाडा) यांनी केलीय. मराठवाड्यातील वाईंदेशी कुणबी मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती हालाखीची आहे. विदर्भातील वाईंदेशी कुणबी मराठा समाजाचा 'कुणबी' या इतर मागासवर्गीय समाजामध्ये समावेश आहे. त्यांना इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळतात. परंतू मराठवाड्यातील वाईंदेशी मराठा कुणबी समाजाचा 'कुणबी' या इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश नाहीय. त्यामुळं या समाजाला इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळत नाही. त्यामुळं या समाज संघटनेनं वेळोवेळी महाराष्ट्र शासनाकडे व राज्य मागासवर्गीय आयोगाकडे निवेदने दिलीत. त्यांचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्याबाबत विनंती केलीय. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय, अशी माहिती मराठवाडा वाईंदेशी कुणबी मराठा सेवा संघ अध्यक्ष राम सावंत यांनी दिलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details