Video : स्कॉर्पिओच्या बोनेट आणि छतावर बसून तरूणांची स्टंटबाजी; व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली/नोएडा - नोएडा पोलीस स्टेशनच्या सेक्टर 24 परिसरातील सेक्टर 51 मध्ये असलेल्या अंडर पासमध्ये पुन्हा एकदा स्टंटबाजी पाहायली मिळाली आहे. चालत्या स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर आणि छतावर बसून काही तरूणांनी स्टंटबाजी केली. दरम्यान तरुणांनी स्वत: व्हिडिओ बनवून व्हायरल देखील केले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला असून वाहन क्रमांकावरून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST