Watch Video : 'मोदी पर उंगली उठाई, तो औकात दिखा दूंगा', अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान खासदारांमध्ये जुंपली
नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मंगळवारी (८ ऑगस्ट) आणि बुधवारी (९ ऑगस्ट) दोन दिवस चर्चा चालणार आहे. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर बोलतील. लोकसभेत महाराष्ट्रातील खासदारांनी या विषयावर आपले मत मांडले. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अविश्वास प्रस्तावावरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत प्रत्येक नेता 'पीएम इन वेटिंग' आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. या दरम्यान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अरविंद सावंत यांनी हिंदुत्वावरून भाजपावर टीका केली, ज्याला नारायण राणेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. पाहा व्हिडिओ...