Nitin Gadkari News: राजकीय पक्ष हे कार्यकर्त्यांना चॉकलेट वाटण्याची फॅक्टरी झाली - नितीन गडकरी - Chandrashekhar Bawankule alliance
नागपूर :केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते बेधडकपणे कोणतेही आढेवेढे न घेता जनतेच्या मनातील भावनांना हात घालतात. रविवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात तुफान बॅटिंग केली. त्यांनी कार्यकर्त्यांची झालेली स्थिती व अवस्था यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, राजकारणात मी सगळे प्रयोग करून थकलो आहे. जे आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करत आहेत. शंभर पदाधिकारी आणि ४० सेक्रेटरी व आघाडीचे प्रकार म्हणजे चॉकलेट वाटण्याची फॅक्टरी झाली आहे. मी देखील या आघाड्या तयार केल्या आहेत. मात्र, ज्यावेळी खऱ्या अर्थाने ज्यावेळी निवडणूक जवळ येते, तेव्हा या आघाड्या 'सळो की पळो' करून सोडतात. मी आघाड्या तयार करून चांगली मूर्ती तयार करायला गेलो. मात्र, फायनल आकार मिळाला तेव्हा गदा हातात आली. सगळ्यांना जोडावे लागते म्हणजे लॉलीपॉप द्यावे लागते. पण आता सर्व लॉलीपॉप संपले आहे.