बाय बाय २०२३! मुंबईतील मरीन ड्राईव्हवरुन पाहा सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त - मरीन ड्राईव्ह सूर्यास्त
Published : Dec 31, 2023, 7:11 PM IST
मुंबई : New Year Mumbai : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२४ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आज रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दूरवरून लोकं आले होते. वर्षातील शेवटच्या दिवशी शेवटच्या सूर्यास्ताला निरोप देण्यासाठी हे लोक इथे एकत्र जमले होते. आम्ही येथे रात्री १२ वाजेपर्यंत थांबणार असून, येथूनचं नवीन वर्षाचं स्वागत करणार, असं येथे आलेल्या मुंबईकरांनी सांगितलं. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मरीन ड्राईव्हसह गेटवे ऑफ इंडियावर देखील लोकांनी गर्दी केली. येथून सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी शेकडो लोक जमले होते. पाहा मरीन ड्राईव्हवर जमलेल्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया.