New Darshan line In Shirdi: शिर्डीतील नवीन दर्शन रांग आज पासून भाविकांच्या सेवेत - दर्शनरांग सुविधा शिर्डी
Published : Oct 27, 2023, 5:10 PM IST
शिर्डी (अहमदनगर)New Darshan line In Shirdi: साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी साई संस्थानच्या वतीने (Shirdi Saibaba) उभारण्यात आलेल्या 110 कोटी रुपयांच्या अद्ययावत अशा वातानुकूलित दर्शन रांगेचं 26 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. (Darshan line for convenience of devotees) आजपासून ही सुविधा या दर्शनरांगेतून साईबाबांचं सशुल्क पास घेऊन दर्शन घेणाऱ्या भक्तांसाठी खुली करण्यात आली आहे. (air conditioned auditorium) साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांच्या हस्ते पूजन करत ही सुविधा सुरू केली गेली आहे. (Darshan line Facility In Shirdi) यामुळे भाविकांना कमी वेळेत कुठल्याही अडचणींचा सामना न करता साईबाबांचं दर्शन सहजपणे घेता येणार आहे. यामुळे साहजिकच भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कशी आहे ही सशुल्क पास धारकांंसाठीची सुविधा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र महाले यांनी...