Neeraj Chopra Interview : 'ईटीव्ही भारत'वर नीरज चोप्रा Exclusive; म्हणाला, एकदा जिंकलेली सर्व पदकं... - नीरज चोप्रा मुलाखत
Published : Oct 7, 2023, 8:01 PM IST
|Updated : Oct 7, 2023, 8:16 PM IST
पानिपत (हरियाणा) : Neeraj Chopra Interview : २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या घरी पानिपतला परतला. घरी परतल्यानंतर त्यानं 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. यावेळी बोलताना नीरजनं, एकदा जिंकलेली सर्व पदकं पुन्हा जिंकायची आहेत, असं सांगितलं. याचाच अर्थ नीरजचं लक्ष आता पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्यानं त्याच्या या ध्येयाकडं वाटचाल सुरू केली आहे. नीरज चोप्रानं 'ईटीव्ही भारत'शी केलेल्या खास संवादात म्हटलं की, खेळाडूच्या आयुष्यात संघर्ष नव्हे तर मेहनत असते. मेहनत केल्यानं यश मिळते. आता मला पुन्हा तेच पदकं जिंकायची आहेत, जे मी यापूर्वी जिंकले आहेत, असं नीरज चोप्रा म्हणाला. पहा नीरज चोप्राची ईटीव्ही भारतशी खास बातचीत..