Nanded Tour of Neelam Gore : हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे शिवसेनेला सगळीकडून घेरले जातेय- नीलम गोऱ्हे - Neelam Gorhe Said That Attempt to Bully Shiv Sena
नांदेड : हिंदी चित्रपटातील नायकाला ज्या पद्धतीने सगळीकडून संकटात ( Neelam Gorhe has Also Alleged on Opposition ) आणले जाते. तसेच प्रयत्न मुंबई मनपा निवडणुकीच्या निमित्ताने होत असल्याचा आरोप गोऱ्हे यांनी केलाय. शिवसेना संपवण्यासाठी ( There is an Attempt to Bully Shiv Sena ) , शिवसेनेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न चालू आहे. नीलम गोऱ्हे या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी मातोश्रीला हफ्ता जात असे, असा आरोप केल्यानंतर त्यांचे सेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी खंडन केले आहे. मला चार वेळेला विधान परिषद आणि त्यानंतर उपसभापतीपद मिळाले पण त्यासाठी रुपया खर्चावा लागला नाही, असे म्हणत गोऱ्हे यांनी ( Buldhana MP Pratap Jadhav Alleged on Matoshree Used to Hafta )आम्ही तुमच्या खासदार निधीच्या टक्केवारीचा हिशेब घ्यावा का, असा सवाल उपस्थित केला आहे. सध्याचे राज्य सरकार हे धूर्त आहे, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. शिंदे गटासोबत गेलेल्या मंडळींचे येणाऱ्या निवडणुकीत काय होते त्याची टेस्ट येत्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत दिसेल, असा दावाही गोऱ्हे यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडून कुठे जातील असे मला वाटत नाही अशी अपेक्षा सेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलीय, त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. नार्वेकर यांच्या बद्दल कुणीतरी अफवा पसरवत आहे पण या चर्चांना काही अर्थ नाही असे गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST