Sharad Pawar Retirement : शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् कार्यकर्त्यांना अश्रू अनावर; म्हणाले, साहेब.... - sharad pawar Resigns In Pune
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी आणि राज्यभरातील कार्यकर्ते हे भावूक झाले आहेत. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी यांच्याकडून पवार यांची मनधरणी सुरू आहे. आता शरद पवार हे यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. अश्यातच पुण्यात देखील कार्यकर्ते हे भावूक झाले आहेत. त्यांनी देखील पवारांकडे साकडे घातले आहे की, आपण हा निर्णय मागे घ्यावे आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे, असे म्हणत कार्यकर्ते भावूक झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे आज प्रकाशन सोहळा पार पडला आहे. आजपर्यंतच्या कारकीर्दीत अनेक गौप्यस्फोट करणारे शरद पवार या पुस्तकातून काय गौप्यस्फोट करणार आहेत, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असताना, पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतेमंडळी हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.