NCP Workers Join BRS: बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापतीसह शेकडो कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश - ncp political crisis
बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापतीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. बीडच्या गेवराईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. बीआरएसचे खासदार बी. बी पाटील यांच्यासह राज्यातील प्रमूख नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याला उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय व बीड जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब म्हस्के यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील अभद्र युती आणि आघाडीला कंटाळून शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीची घोड दौड आता सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा परळीमध्ये भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.