NCP spokesperson aggressive : भाजपच्या बारामती मिशन विरोधात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आक्रमक - भाजप बारामती मिशन
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा आणि खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ Baramati Lok Sabha Constituency होय. मात्र येथे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष विजय मिळवेल, अशी आशा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष BJP State President चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule यांनी व्यक्त केली. तर बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचे, भाजपाचे हे स्वप्न; स्वप्नच राहील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे NCP Spokesperson Mahesh Tapase यांनी भाजपला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघ हा राजकारण नाही तर, समाजकारणाने बांधलेला आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुप्रिया सुळे या राजकारणी पेक्षा, समाजकारणी म्हणून जास्त ओळखल्या जातात, असा चिमटा ही महेश तपासे यांनी काढला. NCP spokesperson aggressive against BJP Baramati mission
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST