Video Viral पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल, कार्यकर्त्याला खुर्चीवर बसवून स्वतः राहिले उभे - Video Viral
पुणे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar हे सोमवारी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. परिंचे येथे शेतकरी मेळावा झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष पुष्कर जाधव हे पवार यांना घेऊन त्यांच्या विभागीय कार्यालयात आले होते. तेव्हा जाधव यांनी पवारांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र, शरद पवार यांनी ऑफीस तुमचं, खुर्ची तुमची असे सांगून जाधव यांना खुर्चीवर नेऊन बसविले. खुद्द पवारांनी खुर्चीवर बसविल्याने त्याची चर्चा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच बरोबर पवार हे स्वतः हा उभे राहिल्याने त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. स्वतः हा साहेब म्हणजेच शरद पवार यांनी मला खुर्चीवर नेऊन बसविले. त्याबाबतच्या भावना शब्दांत मांडता न येणाऱ्या आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला साक्षात माझ्या विठ्ठलाचे दर्शन झाले, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष पुष्कर जाधव यांनी यावेळी आपल्या भावना मांडले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST