Video : अंतर्गत मतभेदामुळे मोदी सरकारविरोधात सक्षम चेहरा लवकर मिळणे अशक्य - शरद पवार - शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका
कोल्हापूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचं की स्वतंत्र याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र माझ्या पक्षात प्राथमिक चर्चा झाली असून काही जण पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून एकत्र यायचं म्हणत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापुरात म्हणाले. तसेच जनता आता महागाईमुळे त्रस्त झाली असून केंद्र सरकार यावर काही बोलायला तयार नाही. भविष्यात जनता केंद्र सरकार विरोधात बंड करतील असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST