NCP Political Crisis : भाजपासोबत जाण्यासाठी रोहित पवारांनीच सुचवलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट - mla Sunil Shelke
Published : Sep 23, 2023, 7:39 AM IST
मावळ(पुणे) : NCP Political Crisis :राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सध्या सतत अजित पवार गटातील आमदारांवर टीका करताना पाहायला मिळतात. जे पक्ष सोडून गेले त्यांना येणाऱ्या काळात खूप काही भोगावं लागणार, असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं होतं. या वक्तव्याचा अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी (Sunil Shelke on Rohit Pawar) चांगलाच समाचार घेत मोठा गौप्यस्फोट देखील केलाय.
राष्ट्रवादी हा एक परिवार :भाजपासोबत सत्तेत सहभागी व्हावं हे सर्वात अगोदर सांगणारे आमदार रोहित पवारच होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही तर तो एक परिवार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमच्यावर अनेक आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. दोन महिन्यांपासून आम्ही सगळे आरोप ऐकत आहोत. राष्ट्रवादी हा परिवार असल्यामुळं परिवारासारखं राहिलं पाहिजे, असं आमदार सुनील शेळके म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेत शरद पवार आणि अजित पवार आपापल्या पद्धतीनं काम करत आहेत. सगळ्यांना न्याय कसा देता येईल याचा विचार करुन त्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचंही आमदार सुनील शेळकेंनी सांगितलं.