NCP political crisis: राष्ट्रवादीत होत आहे ड्रामा, पहा स्पेशल रिपोर्ट - राष्ट्रवादीत बंड
मुंबई: राष्ट्रवादीत बंड करुन अजित पवार उपमुख्यमंत्री तर अन्य 8 आमदार मंत्री बनले. तेंव्हापासूनच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये दुरावा निर्माण झाला असे बोलले जात होते. मात्र मागील तीन दिवसात अजित पवारांनी तीनवेळा शरद पवारांची भेट घेतली. सोमवारीही अजित पवार बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरला दाखल झाले. तिथे तब्बल तासभर पवारांसोबत चर्चा झाली. अजित पवार शरद पवार यांच्या गाठीभेटीवर काँग्रेसने मात्र आक्षेप घेतला. या भेटी विरोधकांना आवडल्या नसल्याचे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या तर बंद खोलीमागील चर्चा लवकरच समोर येतील असा चिमटा, विश्वजित कदम यांनी काढला. यावर शरद पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून, ते काय भूमिका घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.