Supriya Sule Reaction: पक्ष संघटनेत अजित पवारांना काम करण्याची इच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या,.. - Ajit Pawar
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संघटनात्मक जबाबदारी द्या. विरोधी पक्षनेते पद नको अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत्या. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात येणार का? या सगळ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला मनापासून आनंद होत असल्याचे म्हटले आहे. अजितदादांची ईच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे, दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही संघटनात्मक निर्णय आहे. दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांना आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, त्यांनी खुशाल यावे. महाराष्ट्रात दर महिन्याला त्यांचे स्वागतच आहे. पुण्यात आज यशस्विनी अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे आल्या होत्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.