महाराष्ट्र

maharashtra

दीपक मानकर

ETV Bharat / videos

Deepak Mankar On Pune Election: पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत आगामी निवडणूक लढवणार का?...पहा काय म्हणाले शहराध्यक्ष दीपक मानकर

By

Published : Jul 9, 2023, 6:31 AM IST

पुणे :राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. राज्यात काही आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहीजण हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाणवत आहे. अश्यातच आता  अजित पवार यांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर देखील दावा केला आहे. तसेच पक्षबांधणी देखील करायला सुरुवात केली असून पुण्यात माजी उपमहापौर दीपक मानकर यांना शहराध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर प्रदीप देशमुख यांना कार्याध्यक्षपद देण्यात आले आहे. राज्याबरोबर आता पुणे शहरातही दोन गट पडले असून काहीजण शरद पवार यांच्याकडे तर काही जण हे अजित पवार यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. एकूणच आता  मानकर यांना शहराध्यक्ष पद दिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षवाढ तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी मानकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत भाजप बरोबर निवडणूक लढवणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, हे पक्षाचे नेते ठरवणार आहेत. पण आम्ही आमचे विचार हे पुढे घेऊन जाणार असल्याचे  यावेळी त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details