महाराष्ट्र

maharashtra

आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

ETV Bharat / videos

Navratri २०२३ : आई अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 3:58 PM IST

कोल्हापूर :  Karveer Niwasini Ambabai : शारदीय नवरात्री उत्सव काळात (Navratri 2023) करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून 'मानाचा शालू' अर्पण करण्यात आलाय. बुधवारी (18 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिरुपती देवस्थान (Tirupati Devasthana) समितीचे पदाधिकारी केशरी रंगाचा सोनेरी काटपदर असलेला 'मानाचा शालू' घेऊन कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रतिनिधी मिलिंद नार्वेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सुशांत बनसोडे यांनी हा मानाचा शालू स्वीकारला.

'या' दिवशी आई अंबाबाईला शालू नेसवतात : तिरुपती देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला नवरात्री उत्सवाच्या काळात मानाचा शालू पाठवण्याची प्रथा आहे. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे दरवर्षी तिरुपती देवस्थानकडून आलेल्या लाख मोलाच्या शालूचे मंदिर परिसरात मिरवणुकीने आगमन झाले. आई अंबाबाईला अर्पण करण्यात येणाऱ्या या मानाच्या शालूची किंमत 1 लाख 6 हजार 575 रुपये इतकी आहे. 'विजयादशमी' च्या दिवशी हा मानाचा शालू आई अंबाबाईला नेसवण्यात येतो.

ABOUT THE AUTHOR

...view details