Navratri 2023 : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ सप्तशृंगीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यास 465 किलो चांदीचा नवा साज, पहा व्हिडिओ - चांदीचा नवा साज
Published : Oct 18, 2023, 2:10 PM IST
|Updated : Oct 18, 2023, 2:16 PM IST
नाशिक : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या वणी येथील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवीच्या मंदिरासाठी चांदीचा नवीन सुरेख नक्षीदार गाभारा आकर्षण आणि चर्चेचा विषय बनला आहे. नवरात्रीपासून नव्या स्वरूपात भाविकांना मंदिरातील गाभाऱ्यात चांदीतील केलेल्या सुबक कामाचा साज अनुभवता येणार आहे. मंदिरातील गाभाऱ्यास चांदीने सुशोभित करण्याचा निर्णय सप्तशृंगी मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील पीएनजी सन्सची निवड केली. पीएनजी सन्सने यापूर्वी देवीसाठी सोन्याचे अलंकार घडविले होते. चांदीमध्ये अत्यंत सुबक नक्षीकाम झालं असून, नियोजित वेळेत ते पूर्ण झालं आहे. या नक्षीकामात परंपरेला अनुसरून हत्ती, विविध पक्षी, पाने, फुले, घंटा, वेली कीर्तिमुख, नवग्रह, मोर, कमळ,शंख आदी शुभ प्रतीकांचा वापर नक्षी म्हणून केला आहे. सव्वा वर्षापूर्वी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. संपूर्ण रचना ही कुशल रचनाकारांनी केली असून, 70 कारागिरांनी चांदीवर प्रत्यक्ष नक्षीकाम केले. सुमारे 465 किलो चांदी या कामासाठी वापरण्यात आली.