
Navratri 2023: महालक्ष्मी मंदिरात अष्टमीला भाविकांची मोठी गर्दी... पाहा व्हिडिओ - Navratri Utsav In Pune

Published : Oct 22, 2023, 10:34 PM IST
पुणेNavratri 2023: श्री महालक्ष्मी मंदिर, (Mahalaxmi Mandir) श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात (Navratri Utsav In Pune) अष्टमीच्या दिवशी (Navratri Ashtami) मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा 'सार्वजनिक नवरात्र उत्सव' महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा होत आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रथमच महिला मेट्रो चालक व पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा करण्यात आला. तसेच भारताच्या चांद्रयान (Chandrayaan) यशस्वी मोहिमेबद्दल महिला शास्त्रज्ञांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होत आहेत.