महाराष्ट्र

maharashtra

पोटावरतीच केली घटस्थापना

ETV Bharat / videos

Navratri 2023 : एक अनोखी घटस्थापना; सलग तिसऱ्या वर्षी पोटावर घटस्थापना, वाचा कसा राहिला अनुभव - third and final year

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 1:35 PM IST

पंढरपूर (सोलापूर) : मागील आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेनं सुरुवात झाली आहे. घट घरामध्ये देव्हाऱ्याजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी देवीच्याजवळ बसवले जातात, परंतु पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील शिवाजी जाधव यांनी चक्क आपल्या पोटावरतीच ही घटस्थापना केली आहे. घटस्थापने दिवशी सायंकाळी साडेसात वाजता त्यांनी आपल्या पोटावरती ही घटस्थापना केली आहे. जेव्हापासून ही घटस्थापना केली आहे,  तेव्हापासून ते एकाच जागेवरती आहेत. जाधव यांचे पोटावरती घटस्थापना करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. 2021 या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा आपल्या पोटावरती घटस्थापना केली होती. सुरुवातीला तीन ते चार दिवस त्यांना एका जागेवर बसण्याचा त्रास जाणवला नाही.  मात्र पाचव्या दिवशी त्यांना एका जागेवर बसण्याचा त्रास होऊ लागला, तेव्हा त्यांच्या पत्नीने हे व्रत खंडित करण्याचा सल्ला दिला होता. परंतु जाधव यांनी तो सल्ला मान्य केला नाही. शारीरिक त्रास सहन करत व देवीचे नामस्मरण करत जाधव यांनी आपल्या पोटावरची घटस्थापना पुढे चालू ठेवली.  पोटावरती घटस्थापना करण्याचे  त्यांचे शेवटचे वर्ष असणार आहे. पोटावरती घट बसण्यासाठी जाधव हे आहाराचे पथ्य काटेकोरपणे पाळत आहेत. सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पोटावरील हे घट उठवले जाणार आहेत. घट उठल्यानंतरसुद्धा पुढील आठ ते दहा दिवस त्यांना शरीर योग्य प्रकारे साथ देत नाही. परंतु देवीवर श्रद्धा असल्यामुळे पोटावर घट बसवत असल्याचे जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details