महाराष्ट्र

maharashtra

आई अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा

ETV Bharat / videos

Navratri 2023 : हजारोंच्या उपस्थितीत आई अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न; पहा व्हिडिओ - श्री अंबाबाई देवीचा नगरप्रदक्षिणा सोहळा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 11:21 AM IST

कोल्हापूर :सध्या शारदीय नवरात्रौसव सुरू आहे.  साडेतीन शक्तिपीठपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज विधिवत पूजा सुरू आहेत. अंबामाता की जयचा गजर, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, विद्युत रोषणाई फुलांनी सजलेला रथ असा शाही लवाजमा आणि त्यात विराजमान श्री करवीर निवासिनी अंबाबाईचीच्या उत्सवमूर्तीवर फुलांचा वर्षाव अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री श्री अंबाबाई देवीचा नगरप्रदक्षिणा सोहळा पार पडला. यावेळी आई अंबाबाईचा जागर करत हजारो भाविकांनी या नगरप्रदक्षिणेस उपस्थिती लावली. रात्री साडेनऊच्या सुमारास अंबाबाईच्या तोफेची सलामी देत वाहनाचे पूजन होऊन नगरप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर अंबाबाई महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गांवरून तुळजा भवानी मंदिरात येऊन आई तुळजाभवानीचा आणि अंबाबाईचा भेटीचा सोहळा रंगला. याप्रसंगी छत्रपती घराण्यातर्फे देवीची ओटी भरण्यात आली. तसेच मानाचे विडे प्रदान करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details