Navneet Rana Visit Amravati Airport : एका महिन्यात बेलोरा विमानतळावरुन 90 सिटर विमान उडणार - नवनीत राणा - बेलोरा विमानतळ कामाची पाहणी
अमरावती - अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम जोमात सुरू असून आता महिनाभरात या विमानतळावरून 90 सीटर विमान उडणार आहे. विमानतळाच्या नव्या धावपट्टीचा आढावा शुक्रवारी खासदार नवनीत राणा यांनी घेतला. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती बेलोरा विमातळाच्या कामाला गती देण्यासाठी निधीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत केंद्रीय उड्डाणमंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांनी ७५ कोटी रुपये उड्डाण योजने अंतर्गत बेलोरा विमानतळासाठी मंजुर केले. त्या मंजूर निधीमधून पहिला टप्पा ३२ करोड ५० लक्ष रुपये प्राप्त झाले असून या निधीमधून रनवेचे व वॉललकम्पाऊंड तसेच इतर कामे झपाट्याने सुरू आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST