Watch Video: दुमजली इमारत नाल्यात कोसळली, घर प्रमुखाच्या प्रसंगावधाने बचावले 6 जण; पहा व्हिडिओ - नागपूरमधील चांभार नाला
नागपूर: टेका नई वस्ती येथील चिराग अली चौकात असलेली दुमजली इमारत नाल्यात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. चांभार नाल्याजवळ ही दुमजली इमारत होती. इमारत कोसळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या वेळी घडली. दरम्यान यात कोणतीच जीवितहानी झालेले नाही. मात्र घरातील साहित्य,दागिने नाल्यात वाहूने गेले आहे. घटनास्थळी बचाव दल दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुमजली इमारत शकील अन्सारी यांची आहे. इमारत कोसळत असल्याचा अंदाज त्यांना आल्यानंतर त्यांनी घरातील इतर 6 सदस्यांना बाहेर काढले. सर्वजण बाहेर आल्यानंतर संपूर्ण इमारत नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झालेली नाही. परंतु घरात ठेवलेले सर्व साहित्य, दागिने व रोख रक्कम नाल्यात वाहून गेले आहे. टेका नई वस्ती येथील चिराग अली चौकाजवळ एक मोठा नाला वाहतो. या नाल्याला लागूनच घरे आहेत.