महाराष्ट्र

maharashtra

Nagpur Rain Update

ETV Bharat / videos

Nagpur Rain : नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; घरांमध्ये शिरलं पाणी, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 11:07 AM IST

Updated : Sep 23, 2023, 11:17 AM IST

नागपूर : Nagpur Rain : नागपुरात अवघ्या चार तासात १०६ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. सकल भागासह शहरात जागोजागी पाणी भरल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरातील काही भागात पाणी साचल्यामुळं अनेक वृद्ध नागरिक (Heavy Rain in Nagpur) अडकून पडले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. नागपुरात आज सकाळी चार तासांच्या कालावधीत ढगफुटी (Nagpur Rain Video) सदृश्य पाऊस पडल्यानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. सध्या पाऊस थांबला असला तरी अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं शहरात एनडीआरएफचं एक आणि एसडीआरएफच्या दोन टीम मदत कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.  

रस्त्यांना नदीचं रूप :  नागपूर शहरात वाहणारे नदी, नाले तुडूंब भरून वाहत असल्यानं अनेक भागात रस्त्यांवर पाणी आलंय. त्यामुळं बचाव पथकांना रस्त्यावर बोट चालवावी लागत आहे. शहरातील हजारी पहाड या भागात गोठ्यातील काही जनावरंही दगावली आहेत. घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. नागपूर शहरातील अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झालाय. त्यामुळं तलावासमोरील संपूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलीय.

Last Updated : Sep 23, 2023, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details