महाराष्ट्र

maharashtra

शेतात आढळलं रहस्यमयी भूयार

ETV Bharat / videos

अंकाई किल्ला परिसरातील शेतात आढळलं रहस्यमयी भुयार; उलटसुलट चर्चांना उधाण - अंकाई किल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 2:24 PM IST

नाशिक Mysterious Tunnel In Manmad :अनकवाडे शिवारात शेतात रहस्यमय भुयार सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. शेतीची नांगरण करताना शेतकऱ्यांना खड्डा आढळून आला. त्यांनी तत्काळ ग्रामसेवक आणि तलाठी यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तलाठी ग्रामसेवक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पुरातत्व विभागाला कळवलं आहे. मात्र हे भुयार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे येथील युवराज राजाराम धिवर यांच्या शेतात ते नांगरटी करत असताना त्यांना अचानक एक खड्डा दिसला. त्यांनी तत्काळ ग्रामसेवक आणि तलाठी यांना खड्ड्याविषयी माहिती दिली. ग्रामसेवक आणि तलाठी यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीदेखील घटनास्थळी तातडीने येऊन पाहणी केली. पुरातत्व विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करून अहवाल देतील, तेव्हा हे भुयार कसले याबाबत माहिती देण्यात येईल, असं तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी सांगितलं. पूर्वी धान्य किंवा इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित राहण्यासाठी आशा प्रकारे भुयार करून त्या ठिकाणी या वस्तू ठेवण्यात येत होत्या. याशिवाय या शेताच्या अगदी बाजूला अंकाई किल्ला आहे, कदाचित या किल्यावर जाण्या-येण्यासाठी या भुयाराचा वापर केला जात असेल, असंही परिसरात राहणाऱ्या जुन्या नागरिकांनी सांगितलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details