Mumbai Rains: मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस; पाहा अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सब वेमध्ये साचले पाणी - अंधेरी सबवे बंद
मुंबई :हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे. मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. अंधेरीत देखील मागील अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सब वेमध्ये देखील पाणी साचले आहे. चार फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वेमधून वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी उभे राहून अंधेरी पश्चिमेची वाहतूक एस वी रोड वरून सरळ सुरू केली आहे, तर पूर्वेकडील वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बुधवारी मुसळधार पावसाच्या दिवसानंतर, गुरुवारी तुलनेने कमी पाऊस दिसला, परंतु आज सकाळच्या वेळी झालेल्या पावसाने अंधेरी भुयारी मार्ग बंद करावा लागला.